आमच्याविषयी

आमच्याविषयी

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ५ जानेवारी २०१८ रोजी एक शासकीय ठराव जारी करण्यात आला. या ठरावानुसार एमकेसीएलशी संबंधित बाबींकरिता महाराष्ट्र शासनाचा प्रातिनिधिक विभाग म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाऐवजी सामान्य प्रशासन विभागाची नेमणूक झाली आहे.

गुणवत्ताविषयक धोरण

गुणवत्ताविषयक धोरण

भावी ज्ञानयुगात लोकांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता तसेच त्यांच्या विकासाकरिता ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांची जगभर निर्मिती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आपल्या समाजातील युवावर्गात अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये सुप्त कौशल्ये व क्षमता आहेत. त्यामुळे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची आपल्या समाजामध्ये फार मोठी क्षमता आहे असा एमकेसीएलला विश्वास वाटतो.

धोरण

धोरण

डिजिटल साक्षरतेतील तफावत दूर होऊन लोकांचा वैयक्तिक तसेच सामाजिक विकास होईल अशा मूल्याधारित व जागतिक दर्जाच्या प्रणाली शिक्षण, प्रशासन तसेच सबलीकरण यांकरिता निर्माण करणे.

ध्येय

ध्येय

सुयोग्य अशा भागीदारी संबंधांच्या माध्यमातून आजीवन शिक्षण, प्रशासन तसेच सबलीकरण यांसंबंधीच्या -

  • निरनिराळ्या प्रकारचे वैविध्य असणार्‍या प्रचंड मोठ्या समुदायाकरिता : अधिक मोठ्या प्रमाणात
  • जीवनात आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुसंगत तसेच उपयुक्त अशा : अधिक चांगल्या
  • वाजवी मोबदल्यात मिळणार्‍या : स्वल्प दरात
  • शक्य तितक्या कमीत कमी वेळात मिळणार्‍या : अधिक जलद
  • शहरांपासून ते लहान गावांमध्ये सर्वत्र उपलब्ध होणार्‍या : अधिक व्यापक
  • जनसमुदायाकरिता असूनही वैयक्तिक पातळीवर वापरता येतील अशा : समृद्ध आणि व्यक्ती-अनुरूप अनुभव देणार्‍या

सेवा देणे हे एमकेसीएलचे ध्येय आहे. याचे कारण या सेवा व्यक्ती, समाज तसेच राष्ट्रे यांचे अस्तित्व टिकून राहाण्याकरिता, त्यांचा विकास तसेच त्यांचे सबलीकरण याकरिता अतिशय महत्त्वाच्या आहेत.

उद्दिष्टे

उद्दिष्टे

पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था याकरिता लोकांना तयार करणे:

  • विकासाच्या दृष्टीने आजीवन शिक्षणाचा पुरस्कार करणे
  • जागतिक दर्जाच्या ज्ञान संसाधनांच्या निर्मितीस उत्तेजन देणे
  • माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे
  • डिजिटल साक्षरतेतील तफावत व त्यातून निर्माण होणारी ज्ञानातील तफावत दूर करणे
कार्यक्षेत्र

कार्यक्षेत्र

एमकेसीएलने एप्रिल २००२ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात (भारतामधील सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले राज्य जे सुमारे ३००,००० चौरस किलोमीटर क्षेत्रावर वसले असून ज्याची लोकसंख्या १० कोटींहून अधिक आहे) आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला प्रारंभ केला. गेल्या दोन दशकांत एमकेसीएल ही अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणारी, ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेली संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. ई-लर्निंग, ई-प्रशासन आणि ई-सबलीकरण यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच उपाययोजना व सेवा विकसित करून त्या उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर आहे. संस्थेचा ग्राहकसमूह हा सामान्य नागरिक, विद्यापीठे, शासकीय संस्था आणि सामाजिक गट यांनी बनलेला असून दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे.

परिवर्तनशील उपक्रम

परिवर्तनशील उपक्रम

ज्ञानाला महत्त्व देणार्‍या भावी युगात लोकांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता तसेच त्यांच्या विकासाकरिता ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था आणि समाज यांची जगभर निर्मिती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

सुप्त कौशल्ये व क्षमता अंगी असलेल्या अनेक व्यक्ती आपल्या समाजातील युवावर्गात आहेत. त्यामुळे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्याची आपल्या समाजामध्ये फार मोठी क्षमता आहे असा एमकेसीएलला विश्वास वाटतो. मात्र, या समूहाला योग्य दिशा देणे व प्रामुख्याने कृषिप्रधान वा उद्योगप्रधान अशा आपल्या अर्थव्यवस्थेचे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन करणे, हे आव्हानात्मक आहे.

संपूर्ण समाजामध्ये आजीवन शिक्षण संस्कृती रुजवून हे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. सर्वसामान्य जनतेला वाजवी मोबदल्यात, कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी ही ज्ञान संसाधने उपलब्ध करून देता आली तरच इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या विकसनशील समाजात आजीवन शिक्षण प्रक्रिया निरंतर चालू ठेवता येईल. भारतामध्ये तर केवळ माहिती तंत्रज्ञानाचा व्यापक आणि योग्य वापर करूनही आजीवन शिक्षण प्रक्रिया कायम चालू ठेवता येईल आणि नवे कार्याभिमुख ज्ञान संपूर्ण समाजाला उपलब्ध करून देता येईल. कारण माहिती तंत्रज्ञान तसेच इंटरनेट याद्वारे ज्ञानप्रसाराचे परिवर्तनशील माध्यम तर उपलब्ध होतेच, परंतु त्याशिवाय कार्याभिमुख अशा आपल्या जवळजवळ ९०% ज्ञान संसाधनांच्या निर्मितीकरिता एक व्यासपीठदेखील मिळते. अशा प्रकारे जागृत समाज व ज्ञानाधारित अर्थव्यवस्था यांच्यापर्यंत पोहोचण्याकरिता आवश्यक अशा सामाजिक-आर्थिक परिवर्तनामध्ये डिजिटल साक्षरतेतील तफावत दूर करणे हा महत्त्वाचा विषय ठरतो. डिजिटल साक्षरतेतील तफावत तसेच त्या अन्वये येणारी ज्ञानातील तफावत आणि पर्यायाने निर्माण होणारी संधींमधील तफावत यामुळे जनसामान्यांची उपेक्षा होण्याचा गंभीर धोका आहे. माहिती तंत्रज्ञानाविषयक साक्षरतेच्या व्यापक अभियानाद्वारे हा धोका प्रभावीपणे टाळता येऊ शकतो. जागतिक दर्जाची ज्ञान संसाधने, व्यावसायिक संधी व जागतिक पातळीवरील नोकरीच्या संधी यांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्यासाठी समाजात माहिती तंत्रज्ञानविषयक साक्षरतेची अतिशय आवश्यकता आहे.

जनसामान्यांना कार्यभिमुख ज्ञान व आवश्यक त्या सेवा उपलब्ध करून देणारा एमकेसीएल हा एक व्यावसायिक प्रकल्प आहे. आपल्या कामातून डिजिटल साक्षरता, ज्ञान व संधी यांमधील तफावत दूर करून सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचा एमकेसीएलचा प्रयत्न आहे.

एमकेसीएलने परिवर्तनाची एक नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यामधून शिक्षण, प्रशासन आणि सबलीकरण याच्याशी निगडित अशा उपाययोजना व सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

  • अनेक प्रकारचे वैविध्य असणार्‍या प्रचंड मोठ्या जनसमुदायाकरिता या सेवा आहेत : अधिक मोठ्या प्रमाणात
  • त्या जीवनात आणि कामाच्या ठिकाणी अत्यंत सुसंगत तसेच उपयुक्त आहेत : अधिक चांगल्या
  • या सेवा वाजवी मोबदल्यात मिळतात : स्वल्प दरात
  • या सेवा कमीत कमी वेळात मिळतात : अधिक जलद
  • त्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत सर्वत्र उपलब्ध आहेत : अधिक व्यापक
  • या सेवा जनसमुदायाकरिता असूनही वैयक्तिक पातळीवर वापरता येतील अशा आहेत : समृद्ध आणि व्यक्ती-अनुरूप अनुभव देणार्‍या

माहिती तंत्रज्ञानाचा व्यापक व योग्य वापर आणि स्वत:चे आगळेवेगळे असे सार्वजनिक-खासगी-सामाजिक भागीदारीचे नेटवर्क यांच्या माध्यमातून वरील सहा आव्हाने एकाच वेळी हाताळण्याचा एमकेसीएलचा प्रयत्न आहे.

अशा प्रकारे साधारणपणे सर्वसामान्यांचे व विशेषत: युवावर्गाचे अस्तित्व टिकवून ठेवणे, त्यांचा विकास तसेच त्यांचे सबलीकरण याकरिता अतिशय महत्त्वाच्या अशा ज्ञानकेंद्रित समाजाच्या पायाभरणीस हातभार लावण्याचा एमकेसीएलचा प्रयत्न आहे.

समभागांसंबंधी माहिती

समभागांसंबंधी माहिती

एमकेसीएलच्या प्रारंभीच्या प्रमुख समभागधारकांमध्ये, महाराष्ट्र शासन, राज्यातील दहा विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असणारे व संबंधित नसणारे उद्योगधंदे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाचा ३७.१३% एवढा हिस्सा असून कंपनीने एका बाजूला शासनाची विश्वासार्हता आणि सामाजिक जबाबदारी यांचा, तर दुसर्‍या बाजूला व्यावसायिक स्पर्धात्मकता, बाजारपेठेचे भान, गुणवत्ता, परिवर्तनशीलता, उत्पादकता, लाभदायकता आणि स्वयंपूर्णता यांचा आगळावेगळा समन्वय साधला आहे.

एमकेसीएलचे कार्यक्रम

संयुक्त उपक्रम

  • ओडिशा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड
  • हरयाणा नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड

उपकंपन्या

  • MKCL Knowledge Foundation

आंतरराष्ट्रीय भागीदार

  • एम.के.सी.एल. अरेबिया लिमिटेड
  • एम.के.सी.एल. अरेबिया लिमिटेड (इजिप्त)