एमकेसीएलच्या चॅनल पार्टनर नेटवर्कमध्ये त्यांच्या अधिकृत अध्ययनकेंद्रांचा (ALCs) समावेश आहे. पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या महानगरीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम अशा सर्व प्रदेशांमध्ये असलेले लहान आणि मध्यम स्वरूपाचे माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योजक तसेच शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे या अधिकृत अध्ययनकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

चॅनल पार्टनर नेटवर्क मॅनेजमेंट हा एमकेसीएलचा एक विशेष कार्यक्रम आहे जो इतर अनेक कार्यक्रम आणि प्रकल्प यांच्या अंमलबजावणीस चालना देतो. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशात निरनिराळे उपक्रम राबविण्याकरिता विविध चॅनल पार्टनर्सशी समन्वय साधणे हा चॅनल पार्टनर नेटवर्क मॅनेजमेंट प्रोग्रॅमचा मूळ उद्देश आहे.

भारतातील माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्रांचे सर्वात विशाल नेटवर्क म्हणून हे नावारूपास आले आहे. एमकेसीएलद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘SOLAR’ नामक संपूर्णत: वेब-आधारित व्यवस्थापन प्रणालीद्वारे या नेटवर्कचा समन्वय साधला जातो. वीजप्रवाह खंडित होणे, दूरध्वनी यंत्रणेतील बिघाड, बँडविड्थची कमतरता यांसारख्या प्रासंगिक प्रतिकूल परिस्थितींमध्येदेखील वेळेचे बंधन पाळून एका विस्तीर्ण भौगोलिक प्रदेशात अशा प्रकारच्या व्यापक नेटवर्कचे जवळपास संपूर्णपणे कागदविरहित असे व्यवस्थापन करणे या प्रणालीमुळे शक्य होते.


जनसामान्यांकरिता राबविले जाणारे कार्यक्रम आणि प्रकल्प

  • माहिती तंत्रज्ञान साक्षरता आणि कार्यक्षमता
  • शैक्षणिक ई-प्रशासन कार्यक्रम
  • सामाजिक विकास आणि ई-सबलीकरण कार्यक्रम

आमच्या चॅनल पार्टनर्समध्ये यांचा समावेश आहे: