महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) या कंपनीची स्थापना ‘कंपनी अधिनियम, १९५६’ अंतर्गत करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ५ जानेवारी २०१८ रोजी एमकेसीएलशी संबंधित बाबींकरिता महाराष्ट्र शासनाचा प्रातिनिधिक विभाग म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाऐवजी सामान्य प्रशासन विभागाची नेमणूक करण्यात आली आहे.