गोपनीयता धोरण
एमकेसीएलची वेबसाइट, ॲप्लिकेशन्स (इथून पुढे ‘ॲप्स’ असे संबोधले गेले आहे) आणि एमकेसीएल पुरवित असलेल्या सेवा (एकत्रितपणे, ‘एमकेसीएलची उत्पादने’) यांचे तुम्ही अंतिम वापरकर्ते आहात. तेव्हा महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (इथून पुढे ‘एमकेसीएल’ असे संबोधले गेले आहे) तुमच्याकडून कशा प्रकारे माहिती संकलित करते, तिचा वापर व तिची देवाणघेवाण करते तसेच ती सुरक्षित ठेवते यासंबंधीची माहिती गोपनीयता धोरणामध्ये (‘धोरण’) देण्यात आली आहे.
तुम्ही आमच्या सेवांचा उपभोग घेत असताना आम्हाला प्राप्त होणार्या तुमच्या वैयक्तिक माहितीचे व्यवस्थापन आणि तिची सुरक्षितता याकरिता आम्ही तयार केलेल्या गोपनीयता धोरणासंबंधी तुम्हाला माहिती देण्याची आमची इच्छा आहे. तुम्ही आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचे महत्त्व आम्ही जाणतो आणि म्हणूनच तुमच्या वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्याकरिता उच्चतम पातळीवरील सुरक्षा उपाययोजनांवर भर देतो. लागू असलेले कायदे आणि नियम यांनुसार तुमच्या वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत.
एमकेसीएलच्या कोणत्याही सेवांकरिता केलेली नावनोंदणी किंवा त्यांचा केलेला वापर याद्वारे या धोरणाला असलेली तुमची जाहीर संमती आणि मान्यता दर्शविली जाते.
व्यावसायिक, कायदेशीर व नियामक आवश्यकतांमधील बदलांनुसार या धोरणामध्ये बदल होऊ शकतो आणि हे धोरण तुम्हाला ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाईल. या धोरणामध्ये होणार्या महत्त्वाच्या बदलांविषयी तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. हे धोरण आणि त्यातील बदल यांचा आढावा घेता यावा याकरिता तुम्ही या पेजला नियमित भेट द्यावी असे तुम्हाला सांगितले जात आहे.
माहितीचा वापर
- तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या माहितीचा वापर हा आमच्या व्यवसायाच्या कामकाजाशी संबंधित अशा अनेक उद्देशांकरिता केला जातो. यामध्ये पुढील बाबींचा समावेश असू शकतो:
- तुमची ओळख, तुम्हाला वापरण्याची परवानगी असलेल्या बाबी, तुम्हाला देण्यात आलेले विशेषाधिकार आणि तुमचे आमच्याबरोबरचे संबंध यांची पडताळणी करा.
- उत्पादने व सेवा यांची तरतूद करणे, सेवांची तपासणी करणे किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा करणे, विविध उत्पादने किंवा सेवा यांची शिफारस करणे;
- तुम्ही केलेली विनंती, चौकशी आणि तुमच्या तक्रारी, ग्राहकसेवा आणि संबंधित बाबी यांवर कार्यवाही करणे;
- देयके, चलने, अस्तित्वात असलेल्या किंवा नवीन सेवा, सामग्री, जाहिराती, सर्वेक्षणे, महत्त्वाची धोरणे किंवा इतर प्रशासकीय बाबी यांच्याविषयी तुम्हाला माहिती पुरविणे.
- आमच्या सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता विश्लेषणे आणि पुनरावलोकने.
- तुमच्याकरिता वैयक्तिकृत अशा जाहिराती, उत्पादने आणि योजना सादर करून, आमच्या सेवा वापरताना तुम्हाला येणार्या अनुभवामध्ये सुधारणा करणे.
- तुमची खरेदी पूर्ण करणे.
- कायद्याने दिलेली परवानगी किंवा फसवणूकविरोधी प्रणाली यांनुसार कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सीज्/संस्था किंवा सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित प्रकरणांचा केला जाणारा तपास यांना साहाय्य करणे.
- ईमेल आयडी संग्रहित केली जाईल आणि सूचना / माहिती पाठविण्यासाठी वापरली जाईल.
- तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवण्याकरिता आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि तिचे रक्षण करण्याकरिता योग्य ते सुरक्षा नियम लागू करू. लागू कायद्यांतर्गत तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाईल.
- मात्र, ॲप्स / वेबसाइट यावरील सर्वांकरिता असलेल्या भागात तुम्ही व्यक्त केलेले कोणतेही शेरे, संदेश, ब्लॉग्ज, लेखन इत्यादी गोष्टी या प्रकाशित मजकुरात मोडतात आणि या धोरणामध्ये त्यांना वैयक्तिक माहिती म्हणून ग्राह्य धरले जात नाही. अशा प्रकारची माहिती काढून टाकण्याची विनंती तुम्ही करू शकता, तांत्रिकदृष्ट्या आणि लागू कायद्यांनुसार शक्य असेल तर अशी कोणतीही माहिती काढून टाकण्याचा आम्ही कदाचित आम्ही प्रयत्न करू.
- याशिवाय, वापरकर्त्यांचा कल समजून घेऊन त्याचे विश्लेषण करण्याकरिता, आमच्या सेवा देऊ करण्याकरिता, ॲप्स आणि आमच्या सेवा वापरण्याची वापरकर्त्याची पद्धत जाणून घेण्याकरिता, वापरकर्त्यांची सामूहिक अशी लोकसांख्यिकीय माहिती संकलित करण्याकरिता तसेच आमचे नेटवर्क व ॲप्स यांवरील वापरकर्त्यांची संख्या याविषयीच्या मूल्यमापनाकरिता आम्ही आपोआप संकलित होऊन फाइल्समध्ये संग्रहित झालेल्या वैयक्तिक नसलेल्या माहितीचा वापर करू. वैयक्तिक नसलेली माहिती तुमची वैयक्तिक ओळख उघड करत नसल्यामुळे आमच्या स्वेच्छेनुसार आम्ही वैयक्तिक नसलेली माहिती वापरू तसेच उघड करू शकतो.
माहितीची देवाणघेवाण व माहिती उघड करणे
आम्ही कोणत्याही तिर्हाईत पक्षाला वैयक्तिक माहितीची विक्री करत नाही किंवा ती भाडेतत्त्वावर देत नाही. खाली नमूद केल्यानुसार केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्येच आमच्याकडून वैयक्तिक माहिती उघड केली जाते:
- विलीनीकरण किंवा अधिग्रहण: जेव्हा आम्ही किंवा आमची मालमत्ता दुसर्या व्यावसायिक संस्थेमध्ये विलीन केली जाते किंवा दुसर्या व्यावसायिक संस्थेकडून अधिग्रहित केली जाते तेव्हा, किंवा व्यवसायाचे पुनर्गठन किंवा पुनर्बांधणी यादरम्यान, तुम्ही आम्हाला दिलेली माहिती कदाचित आम्हाला दुसर्या व्यावसायिक संस्थांना द्यावी लागू शकते. जर असा व्यवहार घडला तर दुसरी व्यावसायिक संस्था किंवा नव्याने तयार झालेली सामायिक व्यावसायिक संस्था यांना या गोपनीयता धोरणाचे पालन करणे बंधनकारक असेल याविषयी खात्री बाळगा.
- भागीदार: अनेक विक्रेते, सल्लागार, कंत्राटदार यांना आम्ही कामात सहभागी करून घेतो आणि आमच्या समूहातील कंपन्या किंवा आमच्याशी संलग्न कंपन्या (येथून पुढे यांना आमचे भागीदार म्हणून संबोधले गेले आहे) यांची मदत घेतो. आमचे भागीदार हे संपर्क माहितीची पडताळणी, शुल्कभरणा प्रक्रिया, ग्राहक सेवा, वेबसाइट होस्टिंग (भाडेतत्त्वावर वेबसाइट सेवा पुरविणे), डेटा ॲनॅलिसिस, पायाभूत सुविधांची तरतूद, माहिती तंत्रज्ञानविषयक सेवा यांसारख्या इतर अनेक प्रकारच्या सेवा देतात. हे भागीदार आमची उत्पादने आणि सेवा तुमच्यापर्यंत सुलभतेने पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हे भागीदार आणि त्यांचे कर्मचारी करारांतर्गत तसेच सुरक्षा व गोपनीयता याविषयी असलेल्या कठोर बंधनांचे पालन करत त्यांचे काम करतात. आम्ही आमच्या भागीदारांना आमच्या प्रणालींच्या माध्यमातून तुमची माहिती उपलब्ध करून देऊ शकतो किंवा त्यांच्या सेवा तुम्हाला प्रदान करणे त्यांना शक्य व्हावे म्हणून तुमची वैयक्तिक माहिती त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो.
- शासकीय किंवा न्यायिक प्रक्रिया: शासकीय अधिकारी किंवा एजन्सीज्/संस्था आणि कायदेशीर किंवा न्यायिक अधिकारी यांना, कोणत्याही तपासाकरिता किंवा कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याकरिता किंवा यापैकी कोणत्याही अधिकारी वर्गाकडून केल्या गेलेल्या विनंतीस प्रतिसाद देण्याकरिता किंवा लागू होणार्या अटी व शर्ती यांची अंमलबजावणी करण्याकरिता किंवा आम्ही, आमचे वापरकर्ते आणि भागीदार यांचे हक्क, त्यांची गोपनीयता, सुरक्षा किंवा मालमत्ता यांचे रक्षण करण्याकरिता आम्ही तुमची वैयक्तिक माहिती उपलब्ध करून देऊ शकतो.
- कायदेशीर कारणे: तुमच्याद्वारे उपलब्ध करून दिली गेलेली माहिती ही एखाद्या व्यक्तीची ओळख चोरून तिचा केला जाणारा गैरवापर, फसवणूक आणि इतर बेकायदेशीर कृत्ये यांचा तपास लावण्यास व त्यांना प्रतिबंध करण्यास मदत व्हावी याकरिता; आणि आमची उत्पादने आणि सेवा यांचा गैरवापर रोखण्यासाठी संबंधित खात्यांचा परस्पर सबंध जोडण्याकरिता किंवा त्यांची सांगड घालण्याकरिता तसेच तुम्हाला आमच्या सेवा उपलब्ध करून देण्याकरिता मदत व्हावी याकरिता आमच्या इतर संस्था तसेच संलग्न संस्था यांना दिली जाऊ शकते.
- एमकेसीएलच्या हक्कांचे रक्षण: तुमच्या आणि आमच्या भागीदारांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता, तसेच तिर्हाईत पक्षांकडून आमच्या उत्पादनांचा किंवा माहितीचा अनधिकृत वापर झाल्यास उपलब्ध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास एमकेसीएलला परवानगी देण्याकरिता किंवा होणारे नुकसान कमी करण्याकरिता.
संग्रहण, प्रतिधारण आणि संरक्षण
- तुमचा डेटा व माहिती सुरक्षित ठेवून त्याला संरक्षण पुरविण्याकरिता धोरणात्मक, क्रियात्मक, व्यवस्थापकीय, तांत्रिक आणि भौतिक संरक्षक यंत्रणांची तजवीज करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानक आयएस / आयएसओ / आयईसी २७००१नुसार आम्ही योग्य सुरक्षा पद्धती व प्रक्रिया यांचा अंगीकार केला आहे. वैयक्तिक माहितीचा अनधिकृत वापर आणि त्यामधील बेकायदेशीर हस्तक्षेप यापासून रक्षण करण्याकरिता आम्ही वर नमूद केल्यानुसार उपाययोजनांचा अवलंब केला आहे. याशिवाय, आमच्या कर्मचार्यांना किंवा भागीदारांच्या कर्मचार्यांना तुमची वैयक्तिक माहिती ही केवळ आवश्यकता असेल तरच उपलब्ध होईल याची सुनिश्चिती करण्याकरिता आम्ही उपाययोजना अंगीकारल्या आहे.
- आम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत तेथे केले जाणारे माहितीचे नुकसान, माहितीचा गैरवापर आणि त्यामधील बदल यापासून रक्षण करण्याकरिता, आमची वेबसाइट, ॲप्लिकेशन्स, पोर्टल्स आणि नेटवर्क साधनसामग्री यांमध्ये आम्ही प्रचलित औद्योगिक निकषांनुसार सुरक्षाविषयक सावधगिरीच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या खात्याच्या माहितीमध्ये बदल करता किंवा तिचा वापर करता तेव्हा आम्ही सुरक्षित प्रणालींचा वापर करतो. आमच्या ताब्यात तसेच नियंत्रणाखाली असलेल्या माहितीचा अनधिकृत वापर होऊ नये याकरिता वाजवी सुरक्षा कार्यपद्धतींद्वारे ती सुरक्षित ठेवली जाते. आमच्याद्वारे वैयक्तिक माहिती किंवा प्रसारित होत असताना तिचे रक्षण करण्याकरिता आम्ही सांकेतिकीकरण किंवा इतर उचित संरक्षण यंत्रणांचा वापर करतो.
- तुमची माहिती किंवा तुमचा डेटा हे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संग्रहित केले जातील. मात्र, काही डेटा हा भौतिक स्वरूपातदेखील संग्रहित केला जाऊ शकतो.
तुमची माहिती किंवा डेटा संकलित करून संग्रहित करणे, त्यावर प्रक्रिया करणे याकरिता आम्ही तिर्हाईत संस्थांसोबत करार करू शकतो, परंतु हे करताना लागू कायद्यांचे संपूर्ण पालन केले जाईल. या तिर्हाईत संस्थांकडे तुमची माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांची स्वत:ची सुरक्षा मानके असू शकतील आणि व्यावसायिकदृष्ट्या योग्य, अशा प्रकारे तुमची माहिती सुरक्षित ठेवण्याकरिता अशा तिर्हाईत संस्थांनी वाजवी सुरक्षा मानकांचा अंगीकार केलेला असणे आमच्याकरिता आवश्यक असेल.
आम्ही वापरत असलेल्या ॲप्लिकेशन्ससह आमचे सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स सुरक्षित ठेवून त्यांचे रक्षण करण्याकरिता आम्ही योग्य ती पावले उचलली आहेत, परंतु हॅकिंग, सोशल इंजिनीयरिंग (फसवणुकीद्वारे वैयक्तिक माहिती काढून घेण्याची कृती), सायबर टेररिझम, तिर्हाईत संस्थांकडून/पक्षांकडून होणारी हेरगिरी, किंवा घातपात, आग लागणे, पूर येणे, स्फोट, दैवी आपत्ती, नागरिकांचा प्रक्षोभ, संप किंवा कोणत्याही प्रकारची औद्योगिक कारवाई, दंगे, बंड, युद्ध, शासनाने उचललेली पावले अशा प्रकारच्या आमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कारणांमुळे होणारे सुरक्षेचे कोणतेही उल्लघंन किंवा वैयक्तिक माहितीचे प्रकटीकरण याला आम्ही जबाबदार असणार नाही.
तिर्हाईत संस्थांच्या / पक्षांच्या वेबसाइट्स, त्यांची ॲप्लिकेशन्स व त्यांच्या सेवा
एमकेसीएलच्या ॲप्लिकेशनमध्ये/ वेबसाइट्सवर इतर वेबसाइट्सच्या / ॲप्लिकेशन्सच्या लिंक्स दिलेल्या असू शकतात. अशा वेबसाइट्स / ॲप्लिकेशन्स ही त्यांच्या त्यांच्या गोपनीयता धोरणांच्या अमलाखाली असतात जी आमच्या नियंत्रणाबाहेरील असतात. एकदा तुम्ही आमच्या सर्व्हर्सवरून बाहेर पडलात (तुमच्या ब्राउजरच्या ॲड्रेसबारमध्ये दिसणारी यूआरएल पाहून तुम्ही कोठे आहात हे तुम्ही सांगू शकता) की तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही माहितीचा वापर हा तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइटच्या / ॲप्लिकेशनच्या ऑपरेटरच्या गोपनीयता धोरणाच्या नियंत्रणाखाली असतो. ते धोरण आमच्या धोरणापेक्षा निराळे असू शकते. यापैकी कोणत्याही वेबसाइट्सचे / ॲप्लिकेशन्सचे गोपनीयता धोरण तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या लिंकमार्फत दिसू शकत नसेल, तर अधिक माहितीकरिता तुम्ही वेबसाइटशी / ॲप्लिकेशनशी थेट संपर्क साधला पाहिजे.
एखाद्या तिर्हाईत संस्थेच्या/पक्षाच्या वेबसाइटला किंवा ॲप्लिकेशनला तुमची माहिती पाठवण्याची विनंती ज्या ज्या वेळी तुमच्याद्वारे आम्हाला केली जाते तेव्हा आम्ही तुम्हाला एक नवीन सूचना पाठवू आणि माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी त्या माहितीमधील तपशिलाबद्दल तुमची संमती घेऊ. हे करत असताना अशा माहितीवर एमकेसीएलचे नियंत्रण नसेल (तिर्हाईत संस्थेची / पक्षाची वेबसाइट किंवा ॲप्लिकेशन यांना दिलेली माहिती किंवा वेबसाइट / ॲप्लिकेशन यांच्या तुम्ही केलेल्या वापरावरून निर्माण झालेला डेटा) आणि एमकेसीएलचे गोपनीयता धोरण लागू होणार नाही. तिर्हाईत संस्थेची/पक्षाची वेबसाइट /ॲप्लिकेशन हे त्यांच्या स्वत:च्या गोपनीयता धोरणानुसार माहिती हाताळेल. एमकेसीएलला माहिती देण्याची विनंती करण्यापूर्वी ग्राहकाने तिर्हाईत संस्थेचे/पक्षाचे गोपनीयता धोरण वाचून त्याला संमती देईल.
माहितीचा वापर, त्यामध्ये बदल व ती काढून टाकणे
तुमच्या नवीनतम माहितीनुसार आमच्याकडील नोंदी अद्ययावत व अचूक ठेवण्याचा आम्ही परिश्रमपूर्वक प्रयत्न करतो. तुम्ही वेळोवेळी देत असलेली माहिती अचूक, सद्यस्थितीतील आणि अद्ययावत आहे व भविष्यातही असेल याची, तसेच अशी माहिती किंवा डेटा उपलब्ध करून देण्याचे सर्व हक्क, परवानग्या आणि संमती तुमच्याकडे आहे याची खातरजमा करण्याची जबाबदारी तुमची असेल.
तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास, आमच्याकडे असणारी तुमची वैयक्तिक व संवेदनशील अशी सर्व खासगी माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तुम्हाला ही माहिती उपलब्ध करून देण्यापूर्वी आम्ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू.
एमकेसीएलशी संपर्क साधून तुम्ही ही माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्याची, ती बदलण्याची किंवा अद्ययावत करण्याची, आणि ती काढून टाकण्याची विनंती करू शकता.
काही ठरावीक माहिती काढून टाकणे किंवा दिलेली संमती मागे घेणे यामुळे तुम्ही आमच्याकडे केलेली नावनोंदणी किंवा तुम्हाला आमच्या सेवा वापरण्याची असलेली परवानगी रद्द होऊ शकते, हे लक्षात घ्या. याशिवाय, माहितीमध्ये बदल करणे, ती अद्ययावत करणे किंवा काढून टाकणे याकरिता तुम्ही केलेली विनंती ही पुढील परिस्थितींमध्ये आम्ही कदाचित पूर्ण करू शकणार नाही: अशा विनंतीसोबत वैध कागदपत्रे दिलेली नसल्यास; किंवा लागू असलेल्या कायद्यानुसार, कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांच्या विनंतीनुसार, अथवा कोणत्याही न्यायिक कार्यवाही अंतर्गत डेटा सांभाळून ठेवणे आवश्यक असल्यास; किंवा अशा विनंतीची अंमलबजावणी करणे अतिशय कठीण असल्यास (जसे की बॅकअप / वेळप्रसंगी वापरता येण्याकरिता ठेवलेल्या जादाच्या प्रतींकरिता केलेल्या विनंत्या, किंवा अशा विनंत्या ज्यांवर कारवाई करण्याकरिता नवीन प्रणालीची अथवा तांत्रिक रचनेतील बदलांची आवश्यकता असल्यास); किंवा अशा विनंत्या ज्यांमुळे इतर वापरकर्त्यांचे खासगीत्व धोक्यात येत असल्यास.
प्रश्न व तक्रारी
तुमच्याकडून आम्ही संकलित केलेल्या तसेच प्रक्रिया केलेल्या वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत आणि याकरिता येथून पुढेही तुमचे सहकार्य लाभेल अशी आशा करतो. तुमच्या वैयक्तिक माहितीचे रक्षण करण्यासंदर्भात तुमची कोणतीही प्रतिक्रिया असल्यास किंवा तुमची कोणतीही सूचना असल्यास तुम्ही आमच्याशी mkcl@mkcl.org यावर संपर्क साधू शकता.